स्वालिया न. शिकलगार
केवळ पाणी शुद्ध करण्यासाठी नव्हे तर तुरटीचा वापर अफलातून आहे
नैसर्गिक उपायांनी उजळ व स्वच्छ काख मिळवण्यासाठी तुरटी वापरली जाते
तुरटीमध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
ही त्वचेची Dead Skin काढून टाकण्यास मदत करते.
काखेतील दुर्गंधी आणि घाम येण्याची समस्या दूर होते.
एका वाटीत थोडे कोमट पाणी घेऊन त्यात तुरटीचा खडा काही सेकंद घोळवा.
आघोळीनंतर हे पाणी काखेवर स्प्रे करा आणि सुकू द्या.
तुरटीची बारीक पावडर बनवून गुलाब जल मिसळून पेस्ट तयार करा.
काळवंडलेल्या जागी पेस्ट लावून हलक्या हाताने मसाज करा ५ मिनिटे
काखेवर लावून १० मिनिटे सुकवू द्या व पाण्याने धुवून टाका.
चिमूटभर तुरटी पावडरमध्ये अर्धा चमचा खोबरेल तेल मिसळा.
हे मिश्रण काखेवर हलक्या हाताने मसाज करा
यामुळे काखेचा काळेपणा कमी होण्यासोबतच त्वचा मऊ होईल.