पुढारी वृत्तसेवा
बदाम वजन कमी करण्यासाठी का फायदेशीर?
बदामांमध्ये प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट मुबलक प्रमाणात असते, जे वजन नियंत्रणात मदत करते.
पोट जास्त वेळ भरलेले राहते
बदाम खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही, त्यामुळे ओव्हरईटिंग टाळता येते.
मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत
बदाम शरीरातील मेटाबॉलिज्म सुधारतात, त्यामुळे कॅलरीज लवकर जळतात.
पोटावरील चरबी कमी होण्यास सहाय्य
नियमित आणि मर्यादित प्रमाणात बदाम खाल्ल्याने पोटाची चरबी हळूहळू कमी होते.
ब्लड शुगर नियंत्रणात राहते
बदामांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने शुगर लेव्हल स्थिर राहते.
सकाळी भिजवलेले बदाम अधिक फायदेशीर
रात्री भिजवलेले बदाम सकाळी सोलून खाल्ल्यास पोषणमूल्ये अधिक मिळतात.
स्नॅक्सऐवजी बदामांचा पर्याय
चिप्स, बिस्किटांऐवजी बदाम खाल्ल्यास वजन वाढत नाही.
पचनक्रिया सुधारते
फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पचन सुधारते.
किती बदाम खावेत?
दिवसाला 5 ते 7 बदाम पुरेसे असतात; जास्त प्रमाण टाळावे.