Almond Milk Benefits : बदाम दूध पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

बदाम दूध (Almond Milk) आरोग्यासाठी अनेक लाभ देते.

बदाम दुधात कॅलरी आणि फॅटचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे ते वजन करण्यात मदत करू शकते.

बदामामध्ये हृदयासाठी चांगले असलेले मोनोअनसॅचुरेटेड फॅट्स असतात.

अनेक व्यावसायिक ब्रँड्सचे बदाम दूध कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीने समृद्ध असते.ते हाडांच्‍या आरोग्यासाठी लाभदायक ठरते.

बदामामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते आणि त्वचेच्या पेशींचे संरक्षण करते. 

साखर न मिसळलेल्या बदाम दुधात कर्बोदकांचे प्रमाण कमी असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून प्रतिबंध होतो.

ज्‍यांना दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी आहे, त्यांच्यासाठी बदाम दूध एक उत्कृष्ट पर्याय आहे.

टीप:  ही माहिती केवळ मार्गदर्शन म्हणून विचारात घ्यावी.कोणत्याही घरगुती उपायांचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

येथे क्‍लिक करा.