Alcohol Effects | दारू आणि वयाचा आहे थेट संबंध! काय आहे शास्त्रीय कारण?

पुढारी वृत्तसेवा

तरुणपणी मद्यपानाचा शरीरावर होणार परिणाम प्रतिकुलच असतो, पण वय वाढल्यावर त्याचा त्रास अधिक का होतो? यावर अनेक संशोधन झाले आहे.

मद्यपानानंतर दुसऱ्या दिवशी जाणवणारा हँगओव्हर हा केवळ शारीरिक थकवा नसून, वाढत्या वयानुसार शरीरात होणाऱ्या बदलांचा तो एक गंभीर परिणाम असल्याचे अनेक संशोधनांतून समोर आले आहे.

जसे वय वाढते तसे शरीराची चयापचय शक्ती क्षीण होते असते. त्यामुळे अल्कोहोल पचवण्यासाठी शरीराला अधिक कष्ट करावे लागतात, यावर जगभरातील संशोधकांचे आता एकमत झाले आहे.

'युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टन'च्या संशोधनानुसार, वाढत्या वयानुसार शरीरातील अल्कोहोल विघटनाची प्रक्रिया मंदावते. यामुळे रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण दीर्घकाळ टिकून राहते आणि हँगओव्हरची तीव्रता कित्येक पटीने वाढते.

संशोधनानुसार, तिशीनंतर वर्षांनंतर दर दशकात स्नायूंचे प्रमाण ८ टक्क्यांनी कमी होते, तर चरबीचे प्रमाण वाढते. हा बदल मद्य पचवण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम करतो.

ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, स्नायूंमध्ये चरबीपेक्षा पाण्याचे प्रमाण जास्त असते. वय वाढल्यामुळे स्नायू कमी होतात आणि पर्यायाने शरीरातील पाणीही कमी होते. परिणामी, घेतलेली दारू शरीरात हवी तशी सौम्य (Dilute) होऊ शकत नाही.

पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक धोका महिलांमध्ये नैसर्गिकरित्या स्नायूंचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असते. त्यामुळे समान प्रमाणात मद्यप्राशन केले तरी महिलांच्या शरीरात मद्याची तीव्रता जास्त राहते आणि त्यांना पुरुषांच्या तुलनेत लवकर व जास्त नशा चढते.

अल्कोहोलचे विघटन होताना शरीरात 'ॲसेटाल्डिहाइड' हा विषारी घटक तयार होतो. तरुणपणी शरीर हा विषारी घटक वेगाने बाहेर फेकते, मात्र वाढत्या वयात ही नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया मंदावते.

वाढत्या वयात तहान लागण्याची नैसर्गिक जाणीव कमी होत जाते. अशातच मद्यपानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण अधिकच घटते, ज्यामुळे प्रचंड थकवा आणि 'डिहायड्रेशन'चा त्रास वाढतो.

अल्प प्रमाणात मद्यप्राशन करणेही आरोग्यासाठी असुरक्षित मानले जात आहे. चाळीशीनंतर मद्यपान करताना होणारा त्रास हा खरं तर शरीराने दिलेला धोक्याचा इशाराच असतो, असेही संशोधनांमध्‍ये स्पष्ट झाले आहे.

येथे क्‍लिक करा.