स्वालिया न. शिकलगार
अक्षय तृतीयेचा सण आला की आपल्याकडे सोने खरेदीची लगबग सुरू होते
केवळ सोन्याचे नाणे किंवा बिस्किट न घेता काही जण दागिनेही खरेदी करतात
पण, सोन्याच्या दागिन्यांना पर्याय म्हणून १ ग्रॅम गोल्ड प्लेटेड, १ ग्रॅम ऑर्नामेंट सध्या व्हायरल आहेत
पारंपरिक धाटणीच्या दागिने देखील साडीवर खूपच शोभून दिसतात
मराठी अभिनेत्रींनी या सणाच्या निमित्ताने शेअर केलेले लूक पाहा
पारंपरिक दागिन्यांची क्रेझ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे
गिरीजा प्रभू, प्राजक्ता माळी, सोनाली अन्य लोकप्रिय अभिनेत्रींचा हा खास लूक तुम्ही करू शकता
त्यांनी लूकसाठी ठुशी, कोल्हापुरी साज, चिंचपेटी आणि मोत्यांच्या नथीला अधिक पसंती दिलीय