Namdev Gharal
Akhal-Teke Horse ही जगातील सर्वात दुर्मिळ आणि प्राचीन घोड्यांच्या प्रजातींपैकी एक आहे
या घोड्यातील शुभ्र किंवा सोनेरी रंगातील घोडा अतिशय देखणा व चमकदार दिसतो त्यामुळे त्याला गोल्डन हॉर्स किंवा स्वर्गातील घोडा (Heaven’s Horse)अशी उपाधी मिळाली आहे
हा घोड्याचे मुळ तुर्कमेनिस्तानातील असून त्याच्या अंगावरचा धातूसारखा चमकदार रंग, वेग यामुळे हा प्रसिद्ध आहे
या घोड्याची मुळं सुमारे 3,000 वर्षे जुने आहे. तुर्कमेनीस्तानमधील जमाती युद्ध आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी याचा वापर करत
"अखाल ओअॅसिस" (तुर्कमेनिस्तान) आणि "टेके" जमातीवरून याचे नाव अखल टेके असे पडले आहे
सडपातळ लांब पाय, मजबूत स्नायू ही याची खासियत, याची उंची अंदाजे 4.8 ते 5.3 फूट मानेपर्यंत असते
याचे डोळे मोठे, बदाम आकाराचे असतात व अंगावरील फर गुळगुळीत व रेशमी असते
ऊन, उष्णता आणि कमी पाण्यातही जगण्याची क्षमता असून याचा वेग आणि स्टॅमिना अप्रतिम आहे
याची क्षमता म्हणजे वाळवंटातील लांब अंतराचे प्रवास हा सहज करू शकतो
शुभ्र रंगाबरोबरच सोनेरी, काळा, राखाडी, क्रीमी अशाही रंगामध्ये या प्रजातीचे घोडे असतात
आज जगात फक्त 6000 Akhal-Teke घोडे शिल्लक राहिले आहेत
तुर्कमेनिस्तानमध्ये यांचे संगोपन व संरक्षणासाठी विशेष कार्यक्रम राबवले जात आहेत