मोनिका क्षीरसागर
पचनसंस्था मजबूत करून अपचन व गॅसेसपासून ओवा आराम देतो.
ओव्याचे दररोज सेवन केल्याने पोटदुखी व अजीर्ण कमी होते.
अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे संसर्गांपासून संरक्षण मिळते.
काढा घेतल्यास सर्दी, खोकला आणि कफामध्ये आराम मिळतो.
ओव्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
महिलांमध्ये मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी उपयुक्त ठरते.
सेवन केल्याने भूक वाढते व पचनक्रिया सुधारते.
शरीरातील सूज कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय आहे.
वजन कमी करण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात ओवा उकळून पिणे फायदेशीर ठरते.