संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचा कारभार कोणी सांभाळला?

पुढारी वृत्तसेवा

संभाजी महाराजांच्या निधनानंतर...

स्वराज्याचा कारभार कोणी सांभाळला? मराठा साम्राज्य वाचवणाऱ्या वीरांची कहाणी!

संभाजी महाराजांचे निधन

इ.स. 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे निधन झाले. हा मराठा साम्राज्यासाठी अत्यंत कठीण काळ होता.

राजाराम महाराज गादीवर

संभाजी महाराजांनंतर त्यांचे धाकटे बंधू छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याची धुरा स्वीकारली आणि संघर्ष सुरू ठेवला.

जिंजीकडे ऐतिहासिक प्रस्थान

मुघलांचा वाढता दबाव पाहता राजाराम महाराज तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यावर गेले. तेथूनच त्यांनी स्वराज्याचा कारभार चालवला.

स्वराज्याचे आधारस्तंभ

रामचंद्रपंत अमात्य, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी महाराष्ट्रातील लढाया आणि प्रशासनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

आठ वर्षांचा संघर्ष

जिंजीहून तब्बल आठ वर्षे राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्ध लढा सुरू ठेवला आणि मराठा साम्राज्य टिकवून ठेवले.

महाराष्ट्रात पुनरागमन

इ.स. 1698 मध्ये राजाराम महाराज महाराष्ट्रात परतले. त्यांनी पुढील दोन वर्षे स्वराज्याचा कारभार प्रत्यक्ष पाहिला.

राजाराम महाराजांचे निधन

इ.स. 1700 मध्ये अवघ्या 30 व्या वर्षी सिंहगडावर राजाराम महाराजांचे निधन झाले. स्वराज्यावर पुन्हा संकट आले.

ताराराणींचे धाडसी नेतृत्व

राजाराम महाराजांच्या निधनानंतर महाराणी ताराराणी यांनी पुत्र शिवाजी (दुसरे) यांना गादीवर बसवले आणि स्वतः राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.

ताराराणींनी जपलं स्वराज्य

औरंगजेबासमोर न झुकता ताराराणींनी स्वराज्य टिकवून ठेवले. त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे मराठा साम्राज्याचा संघर्ष अखंड सुरू राहिला.

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना जंजिरा किल्ला का जिंकता आला नाही?

येथे क्लिक करा