African bush Elephant | आफ्रिकेतील बुश एलिफंट या हत्तीच्या प्रजातीविषयी काही अनोख्या गोष्‍टी

Namdev Gharal

जगातील सर्व हत्तींमध्ये आफ्रिकेत आढळणारा बुश एलिफंट ही हत्तीची प्रजाती सर्वात मोठी असते. हा जमिनीवरील सर्वात मोठा सस्‍तन प्राणी ठरतो.

याची उंची असते ही १३ फूट इतकी असते तर वजन ६ हजार ते १०, हजार किलो म्‍हणजे जवळपास १० टन इतके जास्‍त, म्‍हणजे याची उंची एक माळ्याच्या इमारतीएवढी असते

बुश एलिफंटमधील मादीचे वजन साधारणपणे ३,००० ते ४,००० किलोग्रॅम असते, एशियन हत्तीमध्ये एवढे वजन नराचे असते

एकदिवसात यांचे खाणे असते जवळपास ३०० किलो तर हा हत्ती पाणी पित असेल तर २०० लिटर एकाचवेळी पितो

बुश एलिफंटचे सर्वात आकर्षक गोष्‍ट म्‍हणजे त्‍याचे सुळे याची लांबी ९ ते १० फूटांपर्यंत जाऊ शकते, दुसरे वैशिष्‍टये म्‍हणजे या प्रजातीतील मादीलाही सुळे असतात.

बुश हत्तीच्या सोंडेची लांबी साधारणपणे ६.५ ते ७.५ फूट असते. केवळ सोंडेचे वजनच सुमारे १४० ते १६० किलोग्रॅम असू शकते.

आफ्रिकन बुश हत्ती प्रामुख्याने आफ्रिकेतील गवताळ प्रदेश आणि विरळ जंगलात आढळतात. गवत, झाडांची पाने, फांद्या, फळे आणि झाडांची साल हेच त्‍यांचे प्रामुख्याने असते

अशा या महाकाय प्राण्यांचे वजन पेलण्यासाठी त्यांचे पाय एखाद्या मोठ्या खांबासारखे मजबूत असतात

एका पूर्ण वाढ झालेल्या हत्तीच्या कानाची लांबी साधारणपणे ६ फुटांहून अधिक असू शकते. एलिफंट हे हत्ती जंगलात साधारणपणे ६० ते ७० वर्षांपर्यंत जगतात.

आतापर्यंत बुश एलिफंटमध्ये 'फेंकोवी हत्ती' उर्फ 'हेन्री' हा सर्वात महाकाय होता हा . याची उंची १३ फूट तर वजन १२ टन होते. अमेरिकेतील संग्रहालयात याचे शरीर भूसा भरुन ठेवले आहे.

हा हत्ती १९५६ मध्ये अंगोला (Angola) देशातील आग्नेय भागात जोसेफ फेंकोवी या हंगेरियन शिकाऱ्याला आढळला होता.

Peacock |तुम्हाला माहिती आहे का मोराच्या पिसाऱ्यात किती पिसे असतात? दरवर्षी पिसारा का गळतो?