पुढारी वृत्तसेवा
कुत्र्यांची भीती वाटणे स्वाभाविक आहे. विशेषतः अनोळखी कुत्रा समोर आला तर अशावेळी काही गोष्टी लक्षात ठेवा.
कुत्र्याला चिडवू नका. त्याची शेपटी ओढू नका. कान पकडू नका. जबरदस्तीने खेळू नका.
कुत्र्याकडे सतत पाहू नका. थेट नजर भिडवणे टाळा. शांत आणि नॉर्मल राहा.
कुत्रा घरात फिरत असेल तर घाबरू नका. सतत जागा बदलू नका. एका जागी शांतपणे बसा. अचानक उठू नका.
कुत्रा जवळ आला तरी घाबरू नका. लगेच हात पुढे करू नका. त्याला स्पर्श करण्याची घाई करू नका. हात शरीराच्या जवळ ठेवा.
तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर सांगा. मालकाला लगेच बोलवा. “मला थोडी भीती वाटते,” असे सांगा. कुत्र्याला दूर ठेवण्यास सांगा.
कुत्रा जवळ आला तर पळू नका. मोठ्याने ओरडू नका. अचानक हालचाल करू नका. शांत राहण्याचा प्रयत्न करा.
कुत्र्यांची भीती असेल तर आधी सांगा. मालक आहे का ते पाहा. कुत्रा त्रास देत असेल तर मालकाला सांगा.
कुत्र्याने चावा घेतला तर दुर्लक्ष करू नका. जखम लगेच साबण आणि पाण्याने धुवा. लसीकरणाची माहिती तपासा. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.