चालण्‍याचा '6-6-6 रूल' माहिती आहे का? जाणून घ्‍या फायदे

पुढारी वृत्तसेवा

आजच्या धावपळीच्या जीवनात एकाच वेळी १०,००० पावले चालणे काहीसे कठीण आहे; परंतु आपण '6-6-6 वॉकिंग रूल'च्या साहाय्याने हे उद्दिष्ट सहजपणे पूर्ण करू शकता.

जाणून घेऊया, '6-6-6 वॉकिंग रूल' नेमका काय आहे आणि तो कसा पूर्ण करता येतो.

'6-6-6' नियमानुसार, तीन भागांमध्ये मिळून ६,००० पावले चालावे. सकाळी न्याहारीनंतर ६ मिनिटे, दुपारी जेवणानंतर ६ मिनिटे आणि रात्रीच्या जेवणानंतर ६ मिनिटे चालू शकता.

आपल्याला प्रत्येकवेळी वेगाने चालायचे आहे. या विशिष्ट व्यायामामुळे आपण सुमारे ६,००० पावले पूर्ण कराल. उर्वरित पावले आपण आपली दैनंदिन कामे करताना सहजपणे पूर्ण करू शकता.

सहा मिनिटे हा वेळ ऐकायला जरी कमी वाटत असला, तरी सरावाने वेग वाढवला तर मोठे आरोग्यदायी फायदे मिळतात.

वेगाने चालण्‍याचा नियम पचनसंस्था मजबूत करतो.

दिवसभरात एकदाच चालण्याऐवजी '6-6-6 वॉकिंग रूल'नुसार चालल्याने शरीरिक व मानसिकदृष्‍ट्या तुम्‍ही आनंदी राहता.

जेवणानंतर चालल्यामुळे पोट फुगणे आणि आम्लपित्ताचा त्रास कमी होतो. वजनदेखील नियंत्रणात राहते.

'6-6-6 वॉकिंग रूल' सरावाने आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करणे शक्‍य आहे.

येथे क्‍लिक करा.