Acupuncture and Hypertension : उच्च रक्तदाबावर 'अ‍ॅक्युपंक्चर' प्रभावी ठरते का?

पुढारी वृत्तसेवा

पारंपारिक चिनी वैद्यकशास्त्रातील 'अ‍ॅक्युपंक्चर' ही उपचार पद्धती सध्या जगभरात चर्चेत आहे.

अ‍ॅक्युपंक्चरमध्ये शरीरावरील ठराविक बिंदूंवर (Acupoints) अत्यंत बारीक आणि लवचिक सुया टोचल्या जातात. यामुळे शरीरातील नैसर्गिक उपचारात्मक शक्ती जागृत होते.

आधुनिक अ‍ॅक्युपंक्चरमध्ये 'इलेक्ट्रोअ‍ॅक्युपंक्चर'चाही वापर केला जातो, ज्यामध्ये सुयांच्या माध्यमातून सौम्य विद्युत प्रवाह सोडला जातो.

ताणतणाव कमी करून आणि शरीरातील संप्रेरकांवर (हॉर्मोन्स) नियंत्रण मिळवून अ‍ॅक्युपंक्चरद्वारे तात्पुरत्या स्वरूपात रक्तदाब कमी करणे शक्य असल्याचे काही अभ्यासातून समोर आले आहे.

उच्च रक्तदाबावर अ‍ॅक्युपंक्चरच्या परिणामांबाबत वैज्ञानिकांमध्ये संमिश्र मते आहेत: २०१५ मध्‍ये ३३ रुग्णांवर ८ आठवडे उपचार केल्यानंतर त्यांच्या रक्तदाबात घट दिसून आली.

२०१८ मधील संशोधनात स्‍पष्‍ट झालं की, अ‍ॅक्युपंक्चरचा परिणाम १ ते २४ तासांपर्यंत टिकू शकतो.

२०१९ मधील संशोधनानुसार, पाश्चात्य औषधे आणि जीवनशैलीतील बदलांसोबत अ‍ॅक्युपंक्चरची जोड दिल्यास उच्च रक्तदाबावर अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते, असे दिसले.

अनेक तज्ज्ञांच्या मते यातील बहुतांश चाचण्या मर्यादित स्वरूपाच्या असून दीर्घकालीन परिणामांसाठी मोठ्या स्तरावर संशोधनाची आवश्यकता आहे.

अ‍ॅक्युपंक्चर सुरू करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञ अधिकृत परवानाधारक असल्याची खात्री करा. तुमच्याडॉक्टरांशी चर्चा करून आणि इन्शुरन्स कव्हर तपासूनच पुढील पाऊल उचला.

अ‍ॅक्युपंक्चर उच्च रक्तदाबासाठी औषध नसले तरी, आधुनिक औषधांना पूरक उपचार म्हणून ते उपयुक्त ठरू शकते. मात्र, उच्च रक्तदाबाच्या कायमस्वरूपी उपचारांमध्ये याचा समावेश करण्यापूर्वी अधिक संशोधनाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

येथे क्‍लिक करा.