पुढारी वृत्तसेवा
धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराला अपुरी झोप मिळत असेल तर, या समस्येशी सामना करण्यासाठी 'स्लीप बँकिग ही संकल्पना विकसित होत आहे.
ऑक्सफर्ड अकॅडमिकच्या 'स्लीप' जर्नलमध्ये थॉमस बाल्किन यांनी आपल्या लेखात 'स्लीप बँकिंग' संकल्पनेवर लिहिले आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या बाल्किन यांच्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, "झोपेचा इतिहास काहीही असो, सर्व व्यक्तींना स्लीप बँकिंगमुळे फायदा होऊ शकतो."
हा शोधनिबंध दावा करतो की, रात्री काही अतिरिक्त तास झोप घेतल्याने झोपेच्या कमतरतेमुळे होणारी सतर्कता आणि कार्यक्षमतेतील घट भरून काढण्यास मदत होते.
भतूकाळात तुम्हाला कितीही कमी झोप मिळाली असेल तरी स्लीप बॅकिंगमुळे चांगला फायदा होऊ शकतो, असे बाल्किन यांचे महणणे आहे.
रात्री काही अतिरिक्त तास झोप घेतल्याने केवळ झोपेच्या कमतरतेमुळे होणारी कार्यक्षमतेतील घट भरून काढण्यास मदत होत नाही, तर अपुऱ्या झोपेमुळे होणारी शारीरिक हानीही लवकर भरून निघते.
'स्लीप बैंकिंग' या संकल्पनेला विज्ञानाचा आधार आहे. प्रवास, रात्रपाळी, परीक्षा, कामाचे दीर्घ तास किंवा स्पर्धा यासारख्या तणावपूर्ण, अधिक मेहनत करण्याची गरज असलेल्यांना अधिक विश्राती घेणे, असा याचा साधा अर्थ आहे.
आपण बँकेत पैसे साठवतो, तशी झोप साठवून ठेवता येत नसली तरी त्यामुळे शरीर आणि मेंदूचे अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण होते, अशी माहिती त्यांनी दिली.