स्वालिया न. शिकलगार
मराठमोळी शर्वरी वाघ हिने लेहेंगा-चोलीत केलेले फोटोशूट व्हायरल झाले आहे
पेस्टल रंगाच्या ड्रेसमधील तिचा अंदाज नेटकऱ्यांना विशेष आवडला आहे
शर्वरी सध्या अल्फा आणि मै फिर आऊंगा या दोन चित्रपटांमुळे चर्चेत आहे
दरम्यान, तिने परिधान केलेल्या सुंदर गुलाबी लेहेंग्यात भरतकाम आहे
तिच्या ड्रेसची आणखी एक खासियत म्हणजे हिरवा दुपट्टा
गोल्डन टोन्ड झुमके, हेअरस्टाईल, साजेसा मेकअम फोटो फ्रेममध्ये अगदी परफेक्ट आहे
पोशाख आणि दागिन्यांमुळे तिच्या लूकमध्ये एक क्लासिक टच आहे
अल्फामध्ये शर्वरी वाघ आलिया भट्ट सोबत दिसणार आहे
तिचा हा आगामी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय ठरला आहे
चित्रपट इंडस्ट्रीत शर्वरी अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले होते