अभिनेत्री नर्गिस फाखरी वयाच्या ४५ व्या वर्षीही तंदुरुस्त आणि स्लिम आहे.अभिनेत्री सोहा अली खानशी अलिकडेच झालेल्या संभाषणात नर्गिसने स्वतः तिच्या आरोग्य आणि फिटनेसची गुपिते उघड केली आहेत .शरीर स्लिम, टोन्ड आणि आकारात ठेवण्यासाठी ती वर्षातून दोनदा फक्त ९ दिवस पाणी पिते .नर्गिसला खाणे-पिणे खूप आवडते. तिला भारतीय जेवण खूप आवडते .बटर चिकन, पराठे आणि मटण बिर्याणी तिला खूप आवडते . चांगली त्वचा ठेवण्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. ती रात्री सुमारे आठ तास झोप घेते. ती हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करते. ती पौष्टिक आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले पदार्थ खाते . ती वर्षातून दोनदा उपवास करते, ती नऊ दिवस काहीही खात नाही, फक्त पाणी पिते .उपवास करणे खूप कठीण आहे. पण त्याचे परिणाम खूप चांगले आहेत, असे नर्गिस फाखरी सांगते .येथे क्लिक करा