स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री कुंजिका काळंविट हिने शुभविवाह मराठी मालिका सोडली आहे
यामागील कारणही खास आहे ते म्हणजे ती लवकरच आई होणार आहे
तिने एक खास पोस्ट शेअर करून ही माहिती दिलीय
कुंजिका 'शुभविवाह' या मालिकेत काम करतेय
तिची पौर्णिमा पटवर्धन ही भूमिका गाजलीय, पण जड अंत:करणाने तिला ही भूमिका सोडावी लागतेय
तिने फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिवीय-'आज पुन्नो म्हणून माझा शेवटचा भाग आहे, आणि जरी तो कडू गोड असला तरी, हा शेवट नाही'
'फक्त एक सुंदर विराम आहे, जोपर्यंत तारे पुन्हा सगळं काही जुळत नाहीत'
'अशा खास शोचा भाग मला होता आलं, यासाठी मी खूप भाग्यवान समजते'
'प्रेम आणि आठवणींनी, हे सगळं मी नेहमीच माझ्यासोबत ठेवेन. मनापासून धन्यवाद'