पुढारी वृत्तसेवा
'A-10 वॉरथॉग' या लढाऊ विमान ९७६ मध्ये अमेरिकेच्या हवाई सेवेत दाखल झाले.
इराणने मागील आठवड्यात A-10 वॉरथॉग लढाऊ विमानावर पाडल्याचा दावा केला होता.
शत्रूचा थेट मारा झेलूनही हे विमान कसे तग धरते, याची काही प्रमुख कारणे जाणून घेवूया
A-10 वॉरथॉगचा पायलट 'टायटॅनियम बाथटब' नावाच्या संरचनेत सुरक्षित असतो. ५४० किलो वजनाचे हे टायटॅनियम कवच आहे. जमिनीवरून होणारा गोळीबार हे कवच सहजपणे झेलते, ज्यामुळे कॉकपिट सुरक्षित राहते.
शत्रूच्या माऱ्याने विमानाची हायड्रॉलिक प्रणाली निकामी झाली तरी पायलट टायटॅनियम कवचाच्या आतील सुरक्षित केबल्सच्या मदतीने विमानावर नियंत्रण मिळवू शकतो.
विमानाची दोन इंजिने फ्युजलेजच्या वरच्या भागात आणि एकमेकांपासून लांब असल्याने एका इंजिनावर क्षेपणास्त्राचा थेट हल्ला झाला, तरी दुसरे इंजिन सुरक्षित राहते.
या विमानाची रचना अत्यंत कणखर आहे. २३ मिमीच्या चिलखत-भेदी आणि स्फोटक तोफगोळ्यांचा मारा सहन करण्याची क्षमता यामध्ये आहे.
युद्धभूमीवरील अनुभवावरून हे सिद्ध झाले आहे की, एक इंजिन, एक इलेव्हेटर आणि अर्धा विंग गहाळ झाले तरी A-10 विमान सुखरूप उड्डाण करू शकते.
गोळीबारामुळे विमानाचा स्फोट होऊ नये म्हणून इंधन टाक्यांना विशेष रासायनिक फोमचे कवच देण्यात आले आहे. हे फोम लेयर्स 'सेल्फ-सीलिंग' म्हणून काम करतात, ज्यामुळे गोळी लागल्यास इंधन गळती तात्काळ थांबते.
या विमानाची निर्मिती करतानाच १०० हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्यांचा विचार करण्यात आला आहे.