अशी शेळी जिचे कान टेकतात जमिनीला!

Namdev Gharal

तुम्‍ही सर्वसाधारण शेळी पाहिली असाल जिचे कान ४ ते ५ इंच असतात. पण जगात अशी एक शेळी आहे की जिचे कान जमिनीला टेकतात

या शेळीचे नाव आहे. गुलाबी पतरी (Gulabi Pateri) आणि ही आढळते प्रामुख्याने पाकिस्‍तान व महाराष्‍ट्रात मराठवाडा भागातही काही ठिकाणी आढळते

आपल्‍या लांबलचक लाब कानामुळे या बकऱ्या कोणाचेही लक्ष खेचून घेतात. या प्रजातितील पाकिस्‍तानातील शेळ्यांचे कान खूपच लांबलचक असतात

१२ इंचापासून १८ इंचापर्यंत एक फूटापासून दीड फूटापर्यंत यांच्या कानांची लांबी असते

आपल्‍या लांब कानासाठीच नाही तर दूधासाठीही या बकरी उपयुक्‍त ठरतात

दिवसाला १ ते १.५ लीटर दूध या शेळ्या देतात. काही चांगल्या प्रकारच्या शेळ्यांत हे प्रमाण २ लिटरपर्यंतही जाते

गुलाबी पाटेरी शेळीचे मांस स्वादिष्ट मानले जाते. त्यामुळे बाजारात चांगली किंमत मिळते यामुळेही या शेळ्यांचे पालन केले जाते.

तसचे या स्‍वभावाने खूप शांत व सामाजिक असतात. त्‍यामुळे यांना सांभाळणे सोपे असते

मांस व दुधामूळे या आता अमेरिका व चिनमध्येही याचे पालन केले जात आहे

मोठा आकार व लांब कान यामुळे या शेळ्या आकर्षक दिसतात, त्यामुळे पाकिस्तानमध्ये Show - Goat म्हणूनही पाळल्या जातात

पाकिस्तानमधील सिंध प्रांत हा या शेळीचा मुख्य प्रदेश आहे स्‍थानिक पाटेरी जातीवरून सुधारित झालेली ही शेळी मानली जाते

Mandarin Duck | प्रेमाचे प्रतिक असलेला सुंदर बदक