Mandarin Duck | प्रेमाचे प्रतिक असलेला सुंदर बदक

Namdev Gharal

मँडरीन बदक (Mandarin Duck) हा पक्षी जगातील सर्वात सुंदर बदकांपैकी एक मानला जातो. याचे रंग, पिसे खूपच आकर्षक असतात.

चीन व जपानी संस्कृतीत मँडरीन बदक हा निष्ठा, प्रेम आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याचे प्रतीक मानला जातो. लग्नात या पक्ष्यांचे चित्र भेटवस्तू म्हणून दिले जाते.

या बदकाने एकदा जोडीदार निवडला की आयुष्‍यभर एकमेकांची साथ करतात. यामुळे त्‍यांना Love Birds सुद्धा म्‍हटले जाते

नर मँडरीन डक खूपच आकर्षक असतो. त्याच्या पिसांमध्ये नारिंगी, जांभळा, निळा, पांढरा व सोनेरी अशा तेजस्वी रंगांचा सुरेख मिलाफ दिसतो

मादी बदक तुलनेने साधे राखाडी-तपकिरी रंगाची असते, पण तिची डोळ्याभोवतीची पांढरी रिंग खूपच आकर्षक भासते.

डोक्यावर झुबकेदार तुरा व गालांवर पांढऱ्या वक्र रेषा त्याचे सौंदर्य आणखीनच खुलवतात

पंखांवरील वर उंचावलेली नारिंगी पिसे यामुळे त्याला इतर बदकांपेक्षा वेगळे व उठावदार रूप मिळते

मँडरीन डक प्रामुख्याने चीन, जपान, रशिया, कोरिया या देशांमध्ये आढळतो. यांना युरोप व इतर भागात हौस व सौंदर्यामुळे पाळले जातात.

हे बदक प्रामुक्ष्याने प्रामुख्याने बिया, धान्य, फळे, किडे व लहान मासे खातात

यांचे आणखी एक वैशिष्‍ठ्य म्‍हणजे यांची उड्डाण क्षमता: हे पक्षी झाडांवर बसतात आणि उंचावरून झपाट्याने उड्डाण करतात, जे बहुतेक बदकांमध्ये दुर्मिळ असते

Brahma chicken : ७ किलोची कोंबडी पाहिली का?