Dragon Fruit | ड्रॅगन फ्रूटचे '9' आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे
अविनाश सुतार
अँटीऑक्सिडंट्स भरपूर साठा
ड्रॅगन फ्रूटमध्ये बीटालेन्स, फ्लॅवोनॉइड्स, फिनोलिक संयुगे आणि व्हिटॅमिन C यांसारखे अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात
पचनसंस्थेसाठी फायबर आणि प्रिबायोटिक्स
ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबर आणि प्रिबायोटिक्स (विशेषतः ओलिगोसॅकराइड्स) भरपूर प्रमाणात असतात, जे बिफिडोबॅक्टेरिया आणि लॅक्टोबॅसिलससारख्या पचनासाठी उपयुक्त जिवाणूंना पोषण पुरवतात
रोग प्रतिकारशक्तीत वाढ
व्हिटॅमिन C, फ्लॅवोनॉइड्स आणि नैसर्गिक जंतूविरोधी घटकांमुळे ड्रॅगन फ्रूट प्रतिरोधक शक्ती मजबूत करते
हाडे आणि खनिजांचे पोषण
ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी आवश्यक खनिजे असतात. त्यामुळे हाडांची मजबुती, घनता आणि स्नायूंची ताकद वाढते
रक्तातील साखर नियंत्रण आणि मधुमेहविरोधी गुण
विशेषतः लाल ड्रॅगन फ्रूट, रक्तातील साखरेचे नियंत्रण करण्यास मदत करते
हृदयाचे आरोग्य आणि लिपिड संतुलन
ड्रॅगन फ्रूट हृदयासाठी विविध प्रकारे उपयुक्त आहे त्यातील फायबर वाईट (LDL) कोलेस्टेरॉल कमी करते
वजन नियंत्रण आणि ऊर्जा
ड्रॅगन फ्रूट कॅलरी कमी, पाणी, फायबर, मॅग्नेशियम आणि लोह यांसारख्या पोषकद्रव्यांनी समृद्ध आहे
त्वचेचा तेज आणि वृद्धत्वविरोधी फायदे
ड्रॅगन फ्रूटमधील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C कोलेजन निर्मितीस मदत करतात आणि सुरकुत्या, सूर्यप्रकाशामुळे होणारे नुकसान यांसारख्या वृद्धत्वाच्या लक्षणांशी लढतात
९ केसांसाठी आरोग्यदायी
या फळातील पाणी आणि पोषकद्रव्ये केसांना आरोग्यदायी बनवतात