Daily Stretching Benefits : नियमित स्ट्रेचिंगचे ९ जादूई फायदे! शरीर राहील नेहमी फ्लेक्सिबलआणि फिट

पुढारी वृत्तसेवा

दिवसातून काही मिनिटांचे स्ट्रेचिंग तुमच्या शरीरात घडवून आणू शकते मोठे सकारात्मक बदल. जाणून घ्या कसे...

नियमित स्ट्रेचिंगमुळे स्नायूंचा ताठरपणा कमी होतो आणि हालचाल करणे अत्यंत सहज व सोपे होते.

सांधे त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करू लागल्याने दैनंदिन कामांमधील हालचाली अधिक सुलभ होतात.

दीर्घकाळ एकाच जागी बसल्याने येणारा ताठरपणा दूर होतो आणि शरीराची योग्य स्थिती राखली जाते.

दिवसभराच्या थकव्यानंतर सौम्य स्ट्रेचिंग केल्याने ताणलेले स्नायू लगेच शिथिल होतात.

स्ट्रेचिंग करताना स्नायूंची हालचाल झाल्यामुळे शरीरात रक्तपुरवठा उत्तम प्रकारे होतो.

तीव्र व्यायामापेक्षा स्ट्रेचिंगमधील सातत्य महत्त्वाचे आहे; यामुळे वाढत्या वयातही शरीराची लवचिकता टिकून राहते.

स्ट्रेचिंगमुळे शरीरातील कोणता भाग ताणला गेला आहे हे सहज लक्षात येते आणि हालचालींच्या चांगल्या सवयी लागतात.

रोजच्या रुटीनमध्ये केवळ ५ ते १० मिनिटे स्ट्रेचिंगचा समावेश करा आणि अनुभवा एक ताजी व तंदुरुस्त ऊर्जा!

येथे क्‍लिक करा.