भोपळ्याच्या बिया नैसर्गिकरित्या मॅग्नेशियमचा उत्कृष्ट स्रोत आहेत. दररोज सेवन केल्यास रक्तदाब संतुलित ठेवण्यास, हृदयविकाराचा धोका कमी करण्यास, आणि हाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी मदत होते
झिंकमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते
झिंकने भरपूर असलेल्या या बिया रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, जखमा लवकर भरून येण्यास मदत करतात, आणि संसर्ग होण्याचा धोका कमी करतात. प्रतिकारशक्ती संतुलित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात
हृदयासाठी हितकारक चरबी
या बियांमध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-६ हे आरोग्यदायी फॅटी अॅसिड्स असतात. हे वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करते
झोप सुधारण्यासाठी उपयुक्त
भोपळ्याच्या बियांमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा अमिनो ॲसिड असतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी थोड्याशा बिया खाल्ल्यास मन शांत राहतं आणि झोपेची नियमितता सुधारते. झोपेचा त्रास असणाऱ्यांसाठी विशेष लाभदायक ठरू शकते
|
पचनतंत्र सुधारते
या बियांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होते आणि पचनसंस्थेचे आरोग्य टिकून राहते
शरीराचे संरक्षण करणारे अँटीऑक्सिडंट्स
भोपळ्याच्या बियांमध्ये कॅरोटेनॉइड्स आणि जीवनसत्त्व ई यासारखी अँटीऑक्सिडंट्स असतात. सूज कमी करतात आणि कर्करोग, हृदयरोग यांसारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करतात
रक्तातील साखरेचे नियंत्रण
या बियांचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे. यामध्ये आरोग्यदायी चरबी, प्रथिने आणि फायबरही भरपूर आहेत, जे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतात
Pexel Image
भूक नियंत्रण व वजन कमी करण्यात मदत
प्रथिने आणि फायबर यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. दररोज थोड्याशा बिया खाल्ल्यास भूक नियंत्रणात राहते आणि हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते
त्वचा आणि केसांसाठी लाभदायक
भोपळ्याच्या बियांमधील आवश्यक फॅटी अॅसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि झिंक यामुळे त्वचा चमकदार होते आणि केस मजबूत राहतात. ही पोषकद्रव्यं मुरूम कमी करतात आणि केस गळती रोखतात