Non Venomous Snakes | भारतात आढळणारे १० बिनविषारी साप; धोकादायक नसून पर्यावरणासाठी उपयुक्त
अविनाश सुतार
ब्राह्मणी वार्म साप
ब्राह्मणी वर्म साप हा पेन्सिलइतका लहान असतो. गांडुळासारखा दिसतो. तो ओलसर माती आणि बागांमध्ये राहतो, त्याचे अंग चमकदार आणि डोळे लहान असतात, जमिनीखाली राहून मुंग्यांची अंडी व दीमक खातो
बीक्ड वार्म साप
बीक्ड वर्म साप हा लहान असून लपून राहतो. दक्षिण भारताच्या काही भागात आढळतो. हा साप टोकदार नाकाचा असतो. मऊ, ओलसर मातीमध्ये राहतो. तो किडे खातो
भारतीय अजगर
भारतीय अजगर हा भारतातील सर्वात मोठ्या सापांपैकी एक आहे. त्याची लांबी २० फूटांपेक्षा जास्त असते. तो विषारी नाही. उंदीर, पक्षी किंवा लहान प्राणी यांना वेढून गळा आवळून मारतो. दलदल, जंगलात आढळतो
सँड बोआ
सामान्य सँड बोआ हा साप कोरड्या, वाळवंटी भागात आढळतो. त्याला मातीखाली लपून राहायला आवडते. हा निरुपद्रवी साप असून उंदीर आणि उंदीराची पिल्ले खातो
रेड सँड बोआ
रेड सँड बोआला दोन डोके असल्याची चुकीची समज आहे. त्याची शेपूट डोक्यासारखी दिसते. हा साप शांत, रात्री सक्रिय असतो आणि लहान उंदीर व कीटक खातो
फाईल साप
फाईल साप भारताच्या किनारपट्टीवर आणि अंदमान बेटांमध्ये आढळतो. त्याची त्वचा खरखरीत, सँडपेपरसारखी असते. तो पाण्यात किंवा पाण्याजवळ राहतो. मासे खातो. जमिनीवरही दिसून येतो
सामान्य ट्रिंकेट साप
सामान्य ट्रिंकेट साप हा बारीक आणि जलद हलणारा असतो. तो उंदीर, बेडूक आणि लहान पक्षी खातो, आणि शेतात व जंगलात आढळतो. घाबरला तर तो फुत्कारतो
मॉन्टन ट्रिंकेट साप
हा साप पश्चिम घाटात आढळतो आणि त्याच्या ठळक पिवळसर ठिपक्यांसह काळ्या वर्तुळांच्या नमुन्यासाठी ओळखला जातो. तो लहान प्राणी खातो आणि डोंगराळ किंवा जंगल भागात आढळतो
भारतीय उंदीर साप
भारतीय उंदीर साप शहरात, गावात आणि शेतात सहज दिसतो. लोक कधी कधी त्याला नाग समजून मारतात, पण तो विषारी नाही. त्याला उंदीर खायाला आवडतात
बँडेड रेसर
बँडेड रेसर हा लाजाळू साप आहे, त्याचे अंग गुळगुळीत तपकिरी आणि हलक्या रंगाच्या खूणा असतात. तो शेतात आणि कोरड्या भागात राहतो, तो उंदीर आणि किडे खातो