Anirudha Sankpal
पालक :
पालकाची भाजी उच्च ऑक्सलेट असते त्यामुळं किडनीमद्ये कॅल्शियमचे खडे निर्माण होतात. त्यामुळं पालकामधून जरी उच्च पोषणमुल्य मिळत असले तरी त्याचा अतिरेक घातक ठरू शकतो.
बीट
पालकाप्रमाणे बीटमध्ये देखील उच्च ऑक्सलेट लेवल असते. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी बीटरूटचे अतीसेवन टाळलेलं बरं
नट्स, सीड्स
बदाम, काजू यासारख्या नट्समध्ये पोषणमुल्य मोठ्या प्रमाणात असतात. मात्र ज्यांना किडनी स्टोन झाला होता त्यांनी नट्स आणि सीड्स कमी प्रमाणात खावेत नाहीतर त्रास पुन्हा उद्भवू शकतो.
चॉकलेट
डार्क चॉकलेटमध्ये देखील ऑक्सलेट्सचा उच्च स्तर असतो. कधीतरी अल्प प्रमाणात चॉकलेटचे सेवन चालू शकते मात्र त्याचा अतिरेक झाला तर त्याचा परिणाम तुमच्या किडनीवर होऊ शकतो.
चहा
चहाचे अतीसेवन देखील किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांसाठी घातक आहे. यामुळं शरीरातील ऑक्सिलेटचा स्तर वाढून पुन्हा किडनी स्टोन होऊ शकतो.
लाल मांस
लाल मांसामध्ये प्युरीनचा स्तर अधिक असतो त्यामुळे तुमच्या शरिरातील अॅसिडची लेवल वाढू शकते. जर शरिरातील युरिक अॅसिड वाढलं तर किडनी स्टोन होऊ शकतो.
सोडियमयुक्त पदार्थ
ज्या पदार्थामध्ये सोडियम जास्त प्रमाणात असतं त्याचं अधिक सेवन केल्यानं युरीनमध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. अतिरिक्त कॅल्शियममुळे किडनी स्टोन होण्याचा धोका असतो.
सॉफ्ट ड्रिंक्स
कोला सारख्या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. तसंच त्यात फॉस्फरिक अॅसिड जास्त असतं हे किडनी स्टोन तयार होण्याला आमंत्रण देतं.
व्हिटॅमिन सी सप्लिमेंट
व्हिटॅमिन सी सप्लिमेंटचे प्रमाणाबाहेर सेवन केल्यास किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्हिटॅमिन सी सप्लिमेंट वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्याव्यात.