पुढारी वृत्तसेवा
हिंदू धर्मात पूजेदरम्यान कापूर जाळणे अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय आरती पूर्ण होत नाही.
कापूर जळल्यानंतर त्याची राख मागे उरत नाही. हे आपल्या मनातील वाईट विचार जळून नष्ट होण्याचे आणि पूर्णतः पवित्र होण्याचे प्रतीक आहे.
कापूर ज्याप्रमाणे स्वतःला जाळून प्रकाशात विलीन होतो, त्याचप्रमाणे अहंकार, वासना आणि मोह सोडून दिले पाहिजेत असा संदेश मिळतो.
कापूर जाळल्याने घरातील आणि आसपासच्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो.
कापराचा सुगंध अतिशय प्रसन्न असतो. यामुळे मन शांत होते आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.
कापराची आरती ही ज्ञान, आत्मा आणि आशेचे दर्शन घडवते. हे भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, कापराप्रमाणेच मनुष्याने आपल्यातील मत्सर, गर्व आणि द्वेष यांसारख्या दुर्गणांना जाळून संपवले पाहिजे.
विज्ञानानुसार, कापूर जाळल्याने हवेतील हानिकारक जीवाणू नष्ट होतात आणि वातावरण शुद्ध होते.
घरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळल्याने वातावरण प्रसन्न राहते.