Indian Street Food | पौष्टीक, आरोग्यदायी आहेत 'हे' ८ भारतीय स्ट्रीट फूड, जाणून घेऊया...
अविनाश सुतार
शकरकंदी चाट
शकरकंद चाट हे चाट उकडलेल्या रताळ्यापासून बनवले जाते, ज्यावर मीठ, मिरपूड, जिरेपूड, चाट मसाला, लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकली जाते.
भुट्टा
भुट्टा मक्याच्या दाण्यांपासून बनवला जातो, आचेवर भाजून नंतर लिंबू आणि मीठ लावले जाते. याची चव स्मोकी असते.
मूग डाळ चिला
मूग डाळ चिला हा मूग डाळीचे पीठ, मसाले, भाज्या आणि बेकिंग सोडा वापरून बनवलेला असतो. हा सलाड आणि हिरव्या चटणीसोबत चांगला लागतो.
मसाला डोसा
हा डोसाचा एक उत्कृष्ट प्रकार आहे, ज्यामध्ये पातळ तांदळाच्या क्रेपमध्ये मसालेदार मॅश बटाटे आणि कांद्याचे सारण भरलेले असते. हे नारळाची चटणी आणि सांबारसोबत खाल्ले जाते.
भेळ पुरी
हा एक कुरकुरीत नाश्ता आहे जो मुरमुरे, उकडलेले बटाट्याचे तुकडे, मसाले, कांदा, हिरवी मिरची, लिंबाचा रस, कोथिंबीर आणि शेव घालून बनवला जातो.
मशरूम कबाब
ही डिश बटण मशरूमपासून बनवली जाते. दही आणि मसाल्यांमध्ये मॅरीनेट करून तंदूर किंवा तव्यावर ग्रील केले जाते.
चना चाट
हे चाट उकडलेल्या काळ्या चण्यांपासून बनवले जाते. ज्यामध्ये मीठ, मिरपूड, लिंबाचा रस, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मसालेदार केले जाते.
इडली
इडली हा तांदूळ, उडीद डाळ, मेथीचे दाणे आणि मीठ यांच्या आंबवलेल्या पिठापासून बनवलेला वाफवलेला पदार्थ आहे.