Millets Health Benefits : निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली: दररोज भरड धान्ये खाण्याचे ८ जादूई फायदे!

पुढारी वृत्तसेवा

ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारखी भरड धान्ये (Millets) आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. जाणून घ्या याचे प्रमुख फायदे!

फायबरने समृद्ध असलेल्या मिलेट्समुळे पचन संस्था मजबूत होते आणि बद्धकोष्टाचा त्रास कमी होण्‍यास मदत होते.

मिलेट्स खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरलेले राहते. त्यामुळे वारंवार लागणाऱ्या भुकेवर नियंत्रण मिळवून वजन घटवणे सोपे जाते.

यात असलेले 'कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स' शरीराला सुस्त पडू देत नाहीत आणि दिवसभर सतत ऊर्जा देतात.

लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंकसारख्या आवश्यक खनिजांचा पुरवठा करून मिलेट्स संपूर्ण शरीराचे पोषण करतात.

मुबलक फायबर आणि खनिजांमुळे मिलेट्स हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जातात.

मधुमेहाचा त्रास असलेल्यांसाठी मिलेट्स अत्यंत गुणकारी असून ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात.

स्नायू बळकट करण्यासाठी आणि शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मिलेट्समधील 'प्लांट-बेस्ड प्रोटीन' उत्तम काम करते.

मिलेट्समधील मॅग्नेशियम स्नायूंचा ताण कमी करून मज्जासंस्थेचे (नर्व्ह फंक्शन) कार्य सुरळीत ठेवते.

येथे क्‍लिक करा.