पुढारी वृत्तसेवा
मोबाईल फोनमधील 'एअरप्लेन मोड' चालू करताच नेटवर्क, वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएस एकाच वेळी बंद होतात.
एअरप्लेन मोडमध्ये फोन नेटवर्क टॉवर शोधणे आणि बॅकग्राउंड डेटा वापरणे पूर्णपणे थांबवतो.
संशोधनानुसार एअरप्लेन मोडमुळे फोनच्या चार्जिंग वेगात ४ ते ११ मिनिटांची बचत होते.
सिग्नल शोधण्यासाठी लागणारी ऊर्जा वाचते आणि सर्व पॉवर थेट बॅटरी चार्ज होण्यासाठी मिळते.
चार्जिंगदरम्यान निर्माण होणारी अनावश्यक उष्णता रोखण्यास एअरप्लेन मोड मदत करतो.
अतिउष्णतेमुळे लिथियम-आयन बॅटरीचे मोठे नुकसान होते आणि तिचे आयुष्य कमी होते.
एअरप्लेन मोडमुळे चार्जिंगच्या वेळी फोन जास्त गरम होत नाही आणि बॅटरी सुरक्षित राहते.
नियमित एअरप्लेन मोड वापरल्यास फोनची बॅटरी क्षमता वर्षानुवर्षे उत्तम टिकून राहते.
फोन लवकर चार्ज करायचा असेल आणि बॅटरी वर्षानुवर्षे टिकाऊ ठेवायची असेल, तर ही ट्रिक नक्की वापरा!