summer trip |उन्हाळा सुसह्य करायचाय? उत्तराखंडमधील 'ही' ८ शहरे नक्की पाहा!

पुढारी वृत्तसेवा

नैनिताल नयनरम्य तलावांसाठी ओळखले जाते. येथे बोटींगचा आनंद घेता येतो, तसेच येथील थंड वाऱ्याची झुळूक उन्हाळ्याचा थकवा दूर करते.

'पहाडांची राणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसुरीत धुके आणि निसर्गरम्य वाटा पर्यटकांना भुरळ घालतात.

उन्हाळ्यातही औलीमध्ये हिरवेगार कुरण आणि हिमालयाचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते. शांत सुट्टी घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

पाइनच्या जंगलांनी वेढलेले राणीखेत शांततेसाठी प्रसिद्ध आहे. गर्दीपासून दूर राहून शुद्ध डोंगराळ हवेचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे येतात.

कुमाऊंनी संस्कृतीचा वारसा लाभलेले हे शहर थंड हवामानासाठी ओळखले जाते.

हिमालयाचे विहंगम दृश्य आणि निसर्गाच्या कुशीत वेळ घालवण्यासाठी कौसानीला पसंती दिली जाते.

ट्रेकिंगची आवड असलेल्या लोकांसाठी चोपटा आकर्षक ठिकाण आहे. येथील ताजी हवा आणि हिरव्यागार दऱ्या मनाला उभारी देतात.

गर्दीपासून दूर आणि बर्फाच्छादित शिखरांच्या सानिध्यात राहण्यासाठी मुनस्यारी हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे.

येथे क्‍लिक करा.