पुढारी वृत्तसेवा
सफरचंदामध्ये फायबर भरपूर असते, ते बॅड कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यासआणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.
केळी हे पोटॅशियमचा एक उत्तम स्रोत आहे, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
अननसात असाणारे पोटॅशियम, फायबर आणि ब्रोमेलेन हृदयाला फायदेशीर ठरते.
किवीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, फायबर, व्हिटॅमिन के आणि पाचक एन्झाइम्स असतात, ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
स्ट्रॉबेरीत व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, मॅंगनीज आणि फायबरने समृद्ध असतात. त्या रोगप्रतिकारक शक्ती आणि चयापचय सुधारण्यास मदत करतात.
डाळिंब शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्सनी भरलेले असते. ते रक्तदाब कमी करू शकते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारू शकते.
बटर फ्रूटमध्ये फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
ब्लूबेरीमध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, याचा संबंध रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याशी आणि हृदयाच्या आरोग्याशी असतो.
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.