पुढारी वृत्तसेवा
उन्ह्याचा तडाखा वाढतोय. जाणून घेवूया रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकरीत्या वाढवणार्या फळांविषयी....
कलिंगडामध्ये ९२ टक्के पाणी असते. हे तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.
लसणामध्ये सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असतात. ते शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
जीवनसत्व अ, क आणि ई ने भरपूर असलेला आंबा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.
दह्यातील 'प्रोबायोटिक्स' पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
पपईत जीवनसत्व अ, क आणि ई मुबलक प्रमाणात असतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवते, पचन सुधारते.
अननसामध्ये जीवनसत्व क, मँगेनीज आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच पचनास मदत करते.
द्राक्षांमध्ये 'रेस्वेराट्रोल' नावाचे शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट असते. हे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.