पुढारी वृत्तसेवा
जेवल्यानंतर लगेच झोपू नका, यामुळे पचनक्रिया मंदावू शकते.
लगेच भरपूर पाणी पिणे टाळावे, यामुळे पचन नीट होत नाही.
जेवणानंतर लगेच धूम्रपान करणे आरोग्यासाठी अधिक घातक असते.
फळे खाण्यासाठी जेवणानंतर किमान एक तासाचे अंतर ठेवावे.
जेवल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणे टाळा, कारण ते पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणतात.
कष्टाचे किंवा जड व्यायाम करणे टाळावे, यामुळे पोटात दुखू शकते.
लगेच अंघोळ केल्याने शरीराचे तापमान बदलून पचन प्रक्रियेत अडथळा येतो.
शतपावली करणे चांगले असले तरी खूप वेगाने चालणे टाळा.