पुढारी वृत्तसेवा
नियमितपणे योगासने केल्याने लवचिकतेबरोबरच दुखापतींचा धोकाही कमी होतो.
आपल्या शरीरात पायांची ताकद अत्यंत महत्त्वाची आहे. जाणून घेवूया पायांचे स्नायू मजबूत करणारे ७ सोपी योगासने.
उत्कटासन हे आसन मांड्या आणि पोटऱ्यांच्या स्नायूंना मजबूत करते.
वीरभद्रासनामुळे मांड्या आणि नितंबांचे स्नायू ताकदवान बनतात.
वीरभद्रासन मांड्यांच्या आतील आणि बाहेरील बाजूचे स्नायू टोन करते.
उत्कट कोनासन हे मांड्या, नितंब आणि ओटीपोटाच्या स्नायूंना बळकटी देते.
वृक्षासनामुळे घोटा, पोटऱ्या आणि मांड्यांचे संतुलन सुधारते.
अंजनेयासन हे आसान मांड्या आणि नितंबांचे स्नायू मजबूत करून चपळता वाढवते.
सेतुबंधासन हे आसन हॅमस्ट्रिंग्स आणि पाठीसाठी अत्यंत गुणकारी असून जास्त वेळ बसून राहणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
टीप: ही माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. योगासने नेहमी तज्ज्ञांकडून शिकून घेऊनच त्यांचा सराव करावा.