पुढारी वृत्तसेवा
पुरेशा पाण्यासोबतच योग्य फळांचा आहारात समावेश केल्यास किडनी स्टोनचा धोका कमी होऊ शकतो. जाणून घ्या ७ सर्वोत्तम फळांबद्दल!
शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवणारी आणि सायट्रेट देणारी फळे किडनीच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतात.
लिंबूमधील नैसर्गिक सायट्रेट कॅल्शियम स्टोन तयार होण्यापासून रोखण्यास मदत करते.
संत्र्यामध्ये असलेले गुणधर्म किडनी स्टोनचा धोका नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करतात.
पाण्याचे भरपूर प्रमाण असणारे कलिंगड नैसर्गिकरित्या लघवीचे प्रमाण वाढवून किडनी साफ ठेवते.
शरीराला हायड्रेट ठेवणारे आणि सोडियमचे प्रमाण कमी असलेले खरबूज किडनीच्या निरोगी कार्यासाठी उत्तम आहे.
रोजच्या संतुलित आहारात सफरचंदाचा समावेश किडनी आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.
नाशपाती (Pears): भरपूर पाणी आणि फायबरयुक्त नाशपाती मूत्राशयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.
शरीराला आवश्यक पोषण देणारी पपईचा आहारात समावेश करा.
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.