6 महिन्यांच्या बाळाला पहिल्यांदा काय खाऊ घालावे? प्रत्येक पालकाने वाचावी अशी माहिती

पुढारी वृत्तसेवा

बाळ 6 महिन्यांचे झाले?

आता त्याला पहिल्यांदा काय खाऊ घालायचे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला.

Baby Diet | pudhari

6 महिन्यांनंतरच सॉलिड फूडची सुरुवात

जन्मानंतर पहिले 6 महिने आईचे दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम अन्न असते. त्यानंतर हळूहळू पूरक आहार सुरू करावा.

Baby Diet | pudhari

घाई करू नका!

बाळाची पचनसंस्था अजून नाजूक असते. त्यामुळे सुरुवात नेहमी हलक्या आणि सहज पचणाऱ्या पदार्थांनी करा.

Baby Diet | pudhari

लिक्विड डाएट हा सर्वोत्तम पर्याय

सुरुवातीला बाळाला पातळ सूप, भाज्यांची प्युरी किंवा फळांची प्युरी देणे सुरक्षित मानले जाते.

Baby Diet | pudhari

डाळीचे सूप द्या

डाळ चांगली शिजवून मॅश करा. त्यात थोडे तूप घालून पातळ सूप तयार करा. हे पौष्टिक आणि पचायला सोपे असते.

Baby Diet | pudhari

भाज्यांची प्युरी

गाजर, भोपळा किंवा रताळे उकडून मऊ प्युरी तयार करा. सुरुवातीला एकावेळी एकच पदार्थ द्या.

Baby Diet | pudhari

फळांची प्युरीही उत्तम

केळे, सफरचंद यांची मऊ प्युरी बाळासाठी चांगला पर्याय ठरू शकते.

Baby Diet | pudhari

9 महिन्यांनंतर काय द्यावे?

या वयात डाळ-भात मॅश करून देता येतो. तसेच उकडलेला बटाटा आणि मऊ केळेही देऊ शकता.

Baby Diet | pudhari

1 वर्षानंतरचा आहार

बाळ हळूहळू चावून खायला शिकते. त्यामुळे थोडे अधिक घट्ट आणि सॉलिड पदार्थ देण्यास सुरुवात करता येते.

Baby Diet | pudhari

अंतिम उद्दिष्ट काय?

दीड ते दोन वर्षांचे होईपर्यंत बाळाने घरातील इतर सदस्यांप्रमाणे सामान्य जेवण खायला शिकले पाहिजे. मात्र प्रत्येक बाळ वेगळे असते, त्यामुळे आहारात बदल हळूहळू करा.

Baby Diet | pudhari

टीप

बाळाला नवीन आहार देण्यापूर्वी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Baby Diet | pudhari

सकाळी उपाशीपोटी चहा पिल्याने काय होते?

येथे क्लिक करा