पुढारी वृत्तसेवा
अनेक जणांना सकाळी उठल्यावर चहा पिण्याची सवय असते.
रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय असेल तर हे आरोग्यासाठी वाईट आहे.
चहामधील घटक पोटातील नैसर्गिक ॲसिडला उत्तेजित करतात, ज्यामुळे दिवसभर अस्वस्थता जाणवू शकते.
पचनशक्ती कमकुवत होणे: यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोट जड राहू शकते.
अशक्तपणा: चहा प्यायल्याने तात्पुरती ऊर्जा मिळते, पण नंतर अचानक थकवा जाणवतो आणि भूक मरते.
चहा लघवीचे प्रमाण वाढवतो, ज्यामुळे झोपेतून उठल्यावर शरीरातील पाण्याची पातळी आणखी कमी होऊ शकते.
सकाळी उठल्यावर लगेच चहा पिणे टाळावे. चहा पिण्याआधी १-२ ग्लास कोमट पाणी प्यावे.
तुम्हाला चहा किंवा कॉफी प्यायची असेल तर नाश्त्यानंतर घेवू शकता. सोबत बिस्किटेही खाऊ शकता.