पुढारी वृत्तसेवा
भारताची राष्ट्रीय उद्याने केवळ वाघ आणि हत्तींसाठीच नव्हे, तर जगातील काही सर्वात उल्लेखनीय पक्ष्यांचेही निवासस्थान आहेत.
ग्रेट इंडियन हॉर्नबिल : मोठा पिवळा 'कॅस्क' (शिरोभूषण) आणि प्रभावी चोच असलेला हा पक्षी एखाद्या कॉमिक बुकातून थेट बाहेर उडून आल्यासारखा दिसतो. तो केरळमधील पेरियार आणि अरुणाचल प्रदेशमधील नामदाफा राष्ट्रीय उद्यानमध्ये आढळतो.
फॉरेस्ट आऊलेट : १९७२ मध्ये 'लुप्त' म्हणून घोषित केलेला आणि नंतर १९९७ मध्ये नाट्यमयरित्या पुन्हा शोधलेला हा वन पिंगळा महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पाहिला जातो.
ब्लॅक-नेक्ड स्टॉर्क : एक मीटरपेक्षा जास्त उंच उभा असलेला हा करकोचा, भारतातील सर्वात मोठा आणि दुर्मिळ पाणथळ पक्ष्यांपैकी एक आहे. विशेषतः हिवाळ्यातील स्थलांतर काळात राजस्थानमधील केवलादेव आणि उत्तर प्रदेशमधील दुधवा राष्ट्रीय उद्यानात त्याचे दर्शन होते.
इंडियन पीफॉऊल : भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर तुम्ही कदाचित गावाकडील शेतात किंवा मंदिराच्या आवारात पाहिला असेल; पण त्याला नैसर्गिक अधिवासात पाहणे पूर्णपणे वेगळे आहे. तो राजस्थानमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात आणि कर्नाटकातील बांदीपूर राष्ट्रीय उद्याना पाहणे एक अद्भूत अनुभव ठरतो.
पॅलस'स फिश ईगल : हा महाकाय शिकारी पक्षी भारतात हिवाळ्यात स्थलांतर करतो आणि देशातील कमी दिसणाऱ्या गरुडांपैकी एक आहे. आसाममधील काझीरंगा आणि उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान त्याचे पाहणी पक्षीप्रेमीसाठी पर्वणी ठरते.
इंडियन रोलर (नीलकंठ) : निळ्या पंखांनी हवेत उंच घेतलेल्या भरारीनंतर हा पक्षी अगदी सामान्य जंगलातही नाट्य भरतो. तो मध्य प्रदेशातील पेंच राष्ट्रीय उद्यान आणि गुजरातमधील गिर राष्ट्रीय उद्यानात आढळतो.
ग्रेट इंडियन बस्टर्ड (माळढोक) या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती आहे. विविध अहवालानुसार, माळढोक पक्ष्यांची संख्या सुमारे १५० किंवा १७०-२०० पेक्षा कमी असल्याची माहिती आहे.जवळजवळ एक मीटर उंच असलेला हा पक्षी, भारताचा सर्वात वजनदार उडणारा पक्षी आहे. या पाहण्यासाठी तुम्हाला राजस्थानमधील डेझर्ट राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यावी लागले.