Home Remedies For Stains | कपड्यांवरील डाग काढण्यासाठी 6 जादुई हॅक्स! आता एकही डाग राहणार नाही

पुढारी वृत्तसेवा

टेन्शन संपवा!

कपड्यांवर वारंवार पडणाऱ्या डागांमुळे महागड्या डिटर्जंटचा खर्च वाढतोय? स्वयंपाकघरातील 6 गोष्टींनी डाग गायब करा!

Stains on cloth | Canva

तेलाचा डाग?

त्यावर लगेच लिंबू आणि मीठ चोळा. लिंबातील आम्ल आणि मीठ तेलाचे कण शोषून घेतात आणि डाग जादूने नाहीसा होतो.

Stains on cloth | Canva

शाईची कलाकारी!

शाईचा हट्टी डाग घालवण्यासाठी 2 भाग दूध आणि 1 भाग पांढरा व्हिनेगर एकत्र करून लावा. काही वेळातच डाग नाहीसा होईल.

Stains on cloth | Canva

रक्ताचा डाग:

सर्वात महत्त्वाचा नियम: डागावर कधीही गरम पाणी वापरू नका, नाहीतर डाग कायमचा बसतो! थंड पाणी आणि बेकिंग सोडा लावून हळूवार चोळा.

Stains on cloth | Canva

कॉफी/चहाची मजा झाली शिक्षा?

घाबरू नका! डाग लागलेल्या भागावर थोडी टूथपेस्ट चोळा आणि मग धुवा. कपडा लगेच 'फ्रेश' होईल.

Stains on cloth | Canva

घामाचे पिवळे डाग!

घामाच्या डागांवर व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण शिंपडा. व्हिनेगर घामातील आम्लत्व तटस्थ करते, ज्यामुळे डाग तसाच निघून जातो.

Stains on cloth | Canva

हळदीचा हट्ट!

हळदीचा रंग काढणे कठीण असते. यावर बेकिंग सोडा लावा. बेकिंग सोडा हळदीचा रंग शोषून घेतो आणि तुमचा कपडा चमचमल्यासारखा नवा दिसतो.

Stains on cloth | Canva

कोणताही डाग लागताच जुना होऊ देऊ नका! डाग ओला असतानाच त्यावर लगेच सांगितलेला उपाय केल्यास तो 100% निघतो.

Stains on cloth | Canva

आता महागड्या केमिकल्सची गरज नाही. डाग काढण्यासाठी लागणाऱ्या या 6 वस्तू तुमच्या स्वयंपाकघरात नेहमी उपलब्ध असतात!

Stains on cloth | Canva
Tiger Mating Tigress | pudhari file photo
येथे क्लिक करा