पुढारी वृत्तसेवा
अनोळखी किंवा नवीन लोकांसमोर तुमच्या वर्तनावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि आत्मविश्वासाचा अंदाज लावला जातो.
सतत हसत राहणे किंवा अजिबात न हसता अतिगंभीर राहणे, दोन्ही गोष्टी तुमच्यातील आत्मविश्वासाची कमी दर्शवतात. चेहऱ्यावर नेहमी नैसर्गिक भाव ठेवा.
आपल्या प्रत्येक निर्णयाचे किंवा कृतीचे इतरांसमोर नको तेवढे स्पष्टीकरण (Explanation) देणे बंद करा. आपले म्हणणे स्पष्ट आणि मोजक्या शब्दांत मांडा.
बोलताना सतत खाली पाहणे किंवा अस्वस्थपणे हालचाल करणे लो-कॉन्फिडन्स दर्शवते. उभे राहताना किंवा बसताना पोश्चर नेहमी नॉर्मल आणि आत्मविश्वासी ठेवा.
प्रत्येक ठिकाणी जीन्स आणि टी-शर्टसारखे कॅज्युअल कपडे शोभत नाहीत. प्रसंग, ठिकाण आणि भेटणाऱ्या व्यक्तीनुसारच योग्य ड्रेसिंग करा.
प्रत्येक विषयावर कमेंट करणे किंवा लगेच रिॲक्ट होणे टाळा. लोकांमध्ये असताना विचारपूर्वक आणि शांत राहून इतरांचे ऐकून घेण्याची सवय ठेवा.
तुम्ही जे बोलता, तसेच तुमचे वर्तनही असायला हवे. बोलणे आणि वागणे एकच असेल तरच समाजात आदर आणि गांभीर्य मिळते.
लोकांना भेटताना संभाषणात संयम, शरीराची योग्य ठेवण आणि संवादात स्पष्टता ठेवली तर तुमचा दर्जा आणि प्रभाव नक्कीच वाढेल.
आता वाचलेल्या लहान-सहान चुका टाळून तुमचा आत्मविश्वास वाढवा.