Brain Damage Habits: 'या' ६ वाईट सवयी तुमच्या मेंदूची कार्यक्षमता करतात कमी

Anirudha Sankpal

तुमच्या मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी खालील सहा वाईट सवयी बदलणे अत्यंत आवश्यक आहे

अंधारात जास्त वेळ राहणे

नैसर्गिक प्रकाशाच्या अभावामुळे झोप आणि मानसिक एकाग्रतेवर परिणाम होतो.

नकारात्मक बातम्यांचे सेवन

सततच्या नकारात्मक माहितीमुळे मेंदू तणावात राहतो आणि तुमची विचार करण्याची शक्ती कमी होते.

सामाजिक अलिप्तता

लोकांशी संवाद न साधल्यामुळे मेंदूची उत्तेजना कमी होते आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होतो.

मोठ्या आवाजात हेडफोन्स वापरणे

सतत मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने मेंदूला थकवा येतो आणि लक्ष केंद्रित करणे कठीण होते.

झोपेच्या चुकीच्या सवयी

अपुऱ्या झोपेमुळे मेंदूला रिकव्हरी मिळत नाही, परिणामी निर्णयक्षमता आणि स्मरणशक्ती मंदावते.

साखरेचे अतिसेवन

रक्तातील साखरेचे चढ-उतार मेंदूमध्ये जळजळ (inflammation) निर्माण करतात, ज्यामुळे सुस्तपणा जाणवतो.

येथे क्लिक करा