पुढारी वृत्तसेवा
कोणत्याही ऋतूत सहज उपलब्ध होणारी आणि चविष्ट लागणारी 'फुलकोबी' केवळ भाजी नसून आरोग्याचा खजिना आहे.
फुलकोबीमध्ये फायबर, व्हिटॅमिन C, K, B6 आणि फोलेट यांसारखी महत्त्वाची पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात.
शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी आणि पोटाचा अल्सर व पोटाचा कॅन्सर यांपासून संरक्षण करण्यासाठी फुलकोबी खाणे फायदेशीर ठरते.
फुलकोबीमध्ये असलेल्या भरपूर फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटदुखीच्या समस्यांपासून सुटका मिळते.
फ्लॉवरमधील फायबर आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिडमुळे शरीरातील 'बॅड कोलेस्ट्रॉल' कमी होण्यास मदत होते.
नियमितपणे फुलकोबीचा आहारात समावेश केल्याने हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि शरीर हायड्रेटेड ठेवायचे असेल, तर फुलकोबी हा एक उत्तम पर्याय आहे.
फ्लॉवरमधील व्हिटॅमिन K मुळे हाडांचे आरोग्य सुधारते आणि सांधेदुखीच्या त्रासावरही हे गुणकारी मानले जाते.
फुलकोबी रक्त शुद्ध करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेचे संसर्गापासून रक्षण होते आणि त्वचा निरोगी राहते.
पोटदुखी कमी करण्यासाठी आणि एकंदरच पचनक्रिया सुधारण्यासाठी तसंच सुरळीत राखण्यासाठी फ्लॉवर उपयुक्त ठरतो.
शरीरातील विषद्रव्यं दूर करण्याबरोबरच पोटाचा अल्सर व पोटाचा कॅन्सर यापासून संरक्षण करण्यासाठी फ्लॉवर खाण्याचा सल्ला दिला जातो.