Jiu-Jitsu | राहुल गांधींच्या ‘त्या’ ट्वीटने समोर आलेला ‘ज्यु-जित्सू’ काय प्रकार आहे?

पुढारी वृत्तसेवा

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका ट्वीटमुळे “ज्यु-जित्सू (Jiu-Jitsu)” हा शब्द अचानक चर्चेत आला आहे

ज्यु-जित्सू हा एक मार्शल आर्ट फिटनेस व्यायाम प्रकार आहे, ज्यात ताकदीपेक्षा तंत्र आणि बुद्धिमत्ता वापरून प्रतिस्पर्ध्यावर नियंत्रण मिळवले जाते

Jiu-Jitsu हा एक जपानी मार्शल आर्ट (स्वसंरक्षणाचा प्रकार) आहे. याचा अर्थ साधारणतः “मऊ तंत्र” (gentle art) असा होतो

यात ताकदीपेक्षा तंत्र, संतुलन आणि विरोधकाची ताकद त्याच्यावरच कौशल्याने वापरावी लागते

प्राचीन काळात समुराई योद्धे शस्त्रांशिवाय लढण्यासाठी या प्रकारचा वापर करत होते नंतर याच तंत्रांवर आधारित Judo आणि Brazilian Jiu-Jitsu विकसित झाले

ज्यु-जित्सू खेळात ताकदीपेक्षा तंत्र महत्त्वाचे असते, विरोधकाला जमिनीवर आणणे लॉक आणि चोकचा वापर करून स्वतःचे संरक्षण शिकवते

ज्यु-जित्सू मध्ये शरीर संतुलन, पकड आणि नियंत्रण, जमिनीवरची झुंज या प्रकारचा सराव केला जातो

या व्यायाम प्रकारामुळे शरीर मजबूत आणि लवचिक बनते, वजन कमी करण्यास मदत, आत्मविश्वास वाढतो, स्वतःचे संरक्षण शिकवितो, मानसिक एकाग्रता वाढते

हा व्यायाम प्रकार प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच शिकावा, चुकीच्या पद्धतीने केल्यास दुखापत होण्याची शक्यता असते

येथे क्लिक करा