5 formulas for weight loss | जिमशिवाय वजन नियंत्रणात ठेवायचंय? या ५ टिप्स नक्की फॉलो करा

पुढारी वृत्तसेवा

भरपूर पाणी प्या! जेवणापूर्वी ३० मिनिटे १ पेल पाणी प्या, यामुळे जास्त खाणे टाळता येते

मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी दिवसभरात ८-१० पेले पाणी पिणे गरजेचे आहे

पोट भरण्याऐवजी ८०% भूक भागल्यावर जेवण थांबवा

ताटात ५०% भाज्या-सॅलड, २५% प्रोटीन्स आणि २५% कर्बोदके (Carbs) ठेवा

गोड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, प्रोसेस्ड फूड वजन वाढण्याचे मुख्य कारण आहेत

साखरेऐवजी गुळ किंवा खजूर मर्यादित प्रमाणात वापरा

अपुरी झोप आणि ताण-तणावामुळे 'कोर्टिसोल' संप्रेरक वाढते, ज्यामुळे पोटाची चरबी वाढते

रोज ठराविक वेळी झोपण्याची सवय लावा., ८-९ तास झोप घ्या

फक्त ३० मिनिटे वेगवान चालणे (Brisk Walk), सायकलिंग किंवा योगा करा

पण यात सातत्य (Consistency) सर्वात महत्त्वाचे आहे. मग आजच सुरु करताय ना!

नैसर्गिक गुलाबी ओठांसाठी 'बीटरूट तूप लिप बाम' घरच्या घरी कसे बनवावे?