Tea Drinking Side Effects : रोज चहा पिताय? मग 'या' ३ चुका टाळा; अन्‍यथा आरोग्याला मोठा धोका!

पुढारी वृत्तसेवा

रोज चहा पिणार्‍यांनी 'या' ३ चुका वेळीच सुधारा, असा इशारा फिटनेस कोच डॉ. ज्योती श्रीवास्तव यांनी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिला आहे.

चहा पूर्णपणे सोडण्याची अजिबात गरज नाही; फक्त तो पिण्याची पद्धत योग्य असणे आवश्यक आहे.

उकळता किंवा अति गरम चहा पिण्याची सवय अन्ननलिकेसाठी अत्यंत घातक ठरू शकते.

WHO नुसार ६५°C पेक्षा जास्त गरम पेय रोज प्यायल्यास अन्ननलिकेच्या (Esophagus) कर्करोगाचा धोका वाढतो.

सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास तीव्र ॲसिडिटीचा त्रास उद्भवू शकतो.

चहातील 'टॅनिन' शरीराला अन्नातील आयर्न (लोह) शोषून घेण्यापासून रोखते. त्यामुळे जेवणानंतर लगेच चहा पिणे टाळा.

गरम चहा प्लास्टिकच्या गाळणीने गाळल्यास 'मायक्रोप्लास्टिक' पोटात जाऊ शकते. नेहमी स्टेनलेस स्टीलची गाळणी वापरा.

दिवसातून १ ते २ कपच चहा प्या. चहासोबत बिस्किटांऐवजी मखाणे किंवा भाजलेले चणे यांसारखे हेल्दी पर्याय निवडा.

चहा वारंवार उकळणे किंवा गरम करणे टाळा. आरोग्यविषयक समस्या असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

येथे क्‍किल करा.