Healthy Snacks For Weight Loss : भूकही पळेल अन् वजनही घटेल! हे ९ 'हेल्दी स्नॅक्स' नक्की ट्राय करा

पुढारी वृत्तसेवा

प्रोटीन, फायबरने भरपूर असलेले भाजलेले चणे भूक नियंत्रणासाठी उत्तम पर्याय आहेत. कुरकुरीत आणि चमचमीत खाण्याची इच्छा झाल्‍यास लहान वाटी चणे नक्की खा.

कमी कॅलरी असलेला मखाना पोट भरणारा स्नॅक आहे. पॅकबंद चिप्सऐवजी मखाना थोडे तूप, काळी मिरी आणि हळदीसोबत रोस्ट करून खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.

अंड्यांमधील मुबलक प्रोटीन भूक शमवण्यास मदत करते. १-२ उकडलेली अंडी काकडी किंवा टोमॅटोच्या फोडींसोबत खाल्ल्यास शरीराला संतुलित पोषण मिळते.

साधे दही किंवा ग्रीक योगर्टमधून प्रोटीन मिळते, तर बदाम अन् अक्रोडमधून हेल्दी फॅट्स मिळतात. हे कॉम्बिनेशन दीर्घकाळ पोट भरलेले ठेवते.

सफरचंद, पेरू किंवा केळ्यासोबत साखर नसलेले पीनट बटर खाल्ल्याने शरीराला फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि हेल्दी फॅट्सचा चांगला पुरवठा होतो.

मोड आलेले मूग, काकडी, टोमॅटो, कांदा, लिंबू आणि हलके मसाले एकत्र करून बनवलेली चाट अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असते.

पनीरमधील प्रोटीन भुकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. पनीरचे तुकडे काकडी किंवा टोमॅटोसोबत खाल्ल्याने शरीराला आवश्यक फायबरही मिळते.

झटपट काहीतरी खायचे असल्यास एका फळासोबत थोडे बदाम किंवा अक्रोड खा. केवळ फळ खाण्यापेक्षा ड्रायफ्रूट्ससोबत खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

काकडी, गाजर किंवा सिमला मिरचीचे तुकडे ह्युमससोबत (चण्याच्या डिप) खाणे हा एक कुरकुरीत, फायबर आणि प्रोटीनने समृद्ध असा उत्तम स्नॅक आहे.

येथे क्‍लिक करा.