EGG NUTRITION FACTS : 2 अंडी की 5 अंड्यांचे पांढरे भाग? वजन कमी करण्याबरोबरच मसल्ससाठी काय बेस्ट?

पुढारी वृत्तसेवा

अंडी हे प्रथिनांचा (Protein) उत्तम स्त्रोत मानले जातात; पण वजन कमी करण्यासाठी आणि स्नायूंच्या उभारणीसाठी नक्की कोणता भाग खावा? जाणून घ्या!

फिटनेस जगतात पांढऱ्या भागाला पसंती दिली जाते, तर आधुनिक पोषणशास्त्र संपूर्ण अंडे खाण्याचा सल्ला देते. दोन्हीचे फायदे वेगवेगळे आहेत.

अंड्याच्या पिवळ्या भागात व्हिटॅमिन D, B-व्हिटॅमिन्स, कोलीन आणि निरोगी चरबी (Healthy Fats) यांसारखी आवश्यक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात.

अंड्याचा पांढरा भाग म्हणजे शुद्ध प्रोटीन! यात कॅलरीज आणि चरबी अत्यंत कमी असल्याने वजन नियंत्रणात ठेवणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

2 संपूर्ण अंड्यांमधून १४० कॅलरीज व १२ ग्रॅम प्रोटीन मिळते, तर 5 अंड्यांच्या पांढऱ्या भागातून केवळ ८५ कॅलरीज आणि तब्बल १८ ग्रॅम प्रोटीन मिळते.

कॅलरी डाएट आणि वेगाने वजन कमी करण्यासाठी ५ अंड्यांचे पांढरे भाग खाणे अधिक फायदेशीर ठरते.

स्नायूंची वाढ आणि वर्कआउटनंतर रिकव्हरीसाठी २ संपूर्ण अंडी खाणे उत्तम, कारण पिवळा भाग प्रथिनांचे शोषण वाढवण्यास मदत करतो.

अंड्याचा पिवळा भाग टाळल्यास त्यातील तब्बल ९०% व्हिटॅमिन्स-खनिजे आणि ४३% प्रोटीन वाया जाते! निरोगी व्यक्तींसाठी संपूर्ण अंडे अधिक उपयुक्त आहे.

१ संपूर्ण अंडे + ३ ते ४ अंड्यांचे पांढरे भाग एकत्र करून खा. यामुळे कॅलरीज नियंत्रणात राहून शरीर मजबूत राहण्यासाठी भरपूर पोषक तत्वे मिळतील.

टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. आहारात बदल करण्‍यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

येथे क्‍लिक करा.