Anirudha Sankpal
जीवनशैलीतील बदल आणि शारीरिक हालचाल आजच्या काळात अनेक गंभीर आजारांपासून दूर राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
हार्वर्ड हेल्थच्या अहवालानुसार, प्री-डायबिटीज असलेल्या व्यक्ती व्यायामाच्या मदतीने मधुमेह होण्याचा धोका कमी करू शकतात.
मधुमेह टाळण्यासाठी, प्री-डायबेटिक लोकांनी दर आठवड्यात किमान १५० मिनिटे मध्यम-तीव्रतेचा व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.
एका संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, व्यायाम प्री-डायबिटीजची स्थिती सुधारण्यात खूप प्रभावी ठरतो.
रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या ५८% लोकांनी आठवड्याचे १५० मिनिटांचे व्यायामाचे लक्ष्य पूर्ण केले.
या लोकांनी, कमी व्यायाम करणाऱ्यांच्या तुलनेत, त्यांची रक्तातील साखर सामान्य ठेवण्याची शक्यता चारपट जास्त होती.
तज्ज्ञांनी आहारात सिंपल कार्बोहायड्रेट्स कमी करून फायबरचे सेवन वाढवण्यावर भर दिला.
लठ्ठपणा किंवा जास्त वजन असलेल्या लोकांनी किमान ७% वजन कमी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
व्यायाम रक्तातील साखर कमी करण्यास आणि वाढलेले वजन नियंत्रित करण्यास मदत करतो, जे प्री-डायबिटीजचे मधुमेहात रूपांतर होण्याचे मुख्य कारण आहेत.