India vs Pakistan: पाकड्यांना रडवणारे... हे आहेत भारताच्या विजयाचे ५ 'हिरो'

पुढारी वृत्तसेवा

आशिया चषक २०२५!

भारताने पाकिस्तानला हरवून नववा किताब जिंकला.

पाकिस्तानचे लक्ष्य: फक्त १४६ धावा.

भारताची सुरुवात खराब, पण... तिलक वर्माची मॅच-विनिंग खेळी!

१९.४ षटकांत लक्ष्य पार.

टी२० किंग्ज!

भारताचा सलग दुसरा आणि एकूण ९ वा आशिया चषक किताब!

(२०२३ चा किताबही भारताने जिंकला होता.)

अजिंक्य भारत!

या स्पर्धेत भारत एकही सामना हरला नाही.

पाकिस्तानला याच टूर्नामेंटमध्ये तिसऱ्यांदा हरवले.

तिलक वर्मा

भारताच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो तिलक वर्मा ठरला, ज्याने ६९ धावांची दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

कुलदीप यादव

कुलदीप यादव भारतीय संघाचा 'तुरुपचा एक्का' ठरला. त्याने संपूर्ण स्पर्धेत १७ बळी घेतले आणि या सामन्यातही चार महत्त्वाचे बळी घेत विजयाचा सर्वात मोठा हिरो बनला.

अभिषेक शर्मा

या सामन्यात अभिषेक शर्माला फारशी चमक दाखवता आली नसली तरी, संपूर्ण स्पर्धेत त्याची कामगिरी दमदार राहिली आणि तो सर्वाधिक धावा करणारा देखील ठरला. त्याने ३०० हून अधिक धावा केल्या.

शिवम दुबे

शिवम दुबे या स्पर्धेत एक उत्कृष्ट अष्टपैलू म्हणून उदयास आला आहे. शिवम दुबेने गोलंदाजीतही बळी घेतले आणि त्याचबरोबर त्याने फलंदाजीतही आज दमदार खेळी केली.

वरुण चक्रवर्ती

भारतीय संघासाठी कुलदीप यादवला वरुण चक्रवर्तीनेही दमदार साथ दिली आहे. वरुणने प्रत्येक सामन्यात बळी घेतले आणि या सामन्यातही त्याने २ बळी घेतले.