पुढारी वृत्तसेवा
दररोज फक्त १० मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मनातील विचारांचा गोंधळ थांबून कमालीची शांतता लाभते.
दीर्घ श्वास घेतल्याने शरीरातील 'कोर्टिसोल' या स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी होते, ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदी राहता.
श्वासावर नियंत्रण मिळवल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते आणि कामात किंवा अभ्यासात एकाग्रता वाढण्यास मदत होते.
संथ आणि खोल श्वासोच्छवास केल्यामुळे हृदयाचे ठोके नियमित होतात आणि उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो.
रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातील पेशी अधिक सक्रिय होतात आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
रात्री झोपण्यापूर्वी श्वासावर लक्ष केंद्रित केल्यास निद्रानाशाची समस्या दूर होऊन शांत आणि गाढ झोप लागते.
जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष द्या; यामुळे तुमचे मन लगेच शांत होईल आणि तुम्ही चुकीचे पाऊल उचलणार नाही.
योग्य पद्धतीने श्वास घेतल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटते.