Health benefits of Broccoli : सुपरफूड ब्रोकोली खाण्याचे 'हे' १० जबरदस्त फायदे जाणून घ्‍या!

पुढारी वृत्तसेवा

ब्रोकोली ही केवळ दिसायलाच खास नाही, तर आरोग्यासाठी अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे.

ब्रोकोलीमध्ये असलेले 'व्हिटॅमिन सी' शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

ब्रोकोलीमधील 'व्हिटॅमिन के' हाडे मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

ब्रोकोलीमधील मुबलक फायबरमुळे पचन सुरळीत होते आणि बद्धकोष्ठाचा त्रास दूर राहतो.

अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरमुळे हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.

यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराच्या पेशींना फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात.

कमी कॅलरीज असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्रोकोली हा उत्तम पर्याय आहे.

यातील 'फोलेट' तांबड्या रक्तपेशींच्या निर्मितीत आणि पेशींच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावते.

'ल्युटेन' आणि 'झियाझॅन्थिन'सारख्या पोषक घटकांमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ब्रोकोली खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड आणि तंदुरुस्त राहते.

येथे क्‍लिक करा.